श्री हिंगुलांबिका देवी
देवी महात्म्य : श्री हिंगुलांबिका देवी सोलापूरच्या पूर्वभागातील गणेश पेठत सुमारे शंभर वर्षांपूर्वी श्री हिंगुलांबिका देवीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती . देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची , विविध शस्त्रे धारण केलेली आष्टभुजांची असून उग्ररुपाची आहे . मूर्ती पंढरपूर तीर्थक्षेत्रातून घडवून आणली आहे . पार्वती - आंबिकाचे रूप असल्याने हिंगुला - अंबिका म्हणजेच हिंगुलांबिका आसे नाव आलेले आहे. ही भावसार समाजाची कुलस्वामिनी आहे. देवीचे मूळस्थान भारताच्या वायव्येला असलेल्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रदेशातील हाव नदीच्या पलीकडे चंद्रकूप तीर्थ स्थानानंतर मकरंद पर्वत शिखरावर दुर्गम व कठीण अशा हिंगलाज गुहेत स्वयंभू प्रज्वलीय अग्नी व ज्योतीच्या प्रकाशात आहे. भारत , पाकिस्तान व इराण या तीन देशांचे समन्वय साधणारे आपल्या संस्कृतीमध्ये असणाऱ्या ५१ मातृपीठ शक्तिपीठांपैकी एक असणारे मरूतीर्थ हिंगलाज भारतातील भाविक लोकांना जाण्यासाठी कठीण आहे . पाकिस्तानात हिंगलाज देवीला नानीमां आस म्हणतात . दक्ष प्रजापतीच्या यज्ञात देवी सतीने क्रोधाने आत्मसमर्पण केलेल्या पृथ्वीतलावर ५१ ठिकाणी प्रमुख शक्तीपीठांची निमिर्ती झाली . या शक्तीपीठातील प्रमुख व अग्रगण्य शक्तीपीठ म्हणजेच हिंगलाज आग्नेय तीर्थ शक्तीपीठ आहे . अनेक देव ऋषीमुनी , सिद्धपुरुष देवीभक्तांचे पवित्र पूजनीय व जागृत असे हे शक्तीपीठ आहे . भावसार समाजाचे भव्य व सुंदर मंदिर सोलापुरातील गणेशपेठेत आहे . जो वास्तुशिल्पाचा आदर्श व उत्कृष्ट नमुना म्हणून महाराष्ट्रत ओळखला जातो . पूर्ण बांधकाम हे गर्भगुडी काळ्या पाषाणाचे असून आतील भाग मार्बलने सुशोभित केलेला आहे . शिखराची उंची ६५ फूट असून त्यावर अनेक देवदेवतांचे सुंदर मनोहीरी अशा मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत . ५५ किलो चांदीचे सिंहासन आहे . सध्या मंदिर रंगरंगोटीने पूर्ण केलेली असून मंदिराच्या कळसावर ४ किलो सोन्याचा लेप दिला आहे. भावसार देवी ही आराध्य व कुलदैवत असून भक्तांची पालनकर्ती आहे
- ओम हिंगुले परम हिंगुले अमृतृरुपीणी | तन:शक्ती मनशिवाय ओम हिंगुले नमः |
देवी महात्म्य : नव दुर्गा !!
-
शैलपुत्री
पहिले रूप आहे-शैलपुत्री.शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते.
-
ब्रह्मचारिणी
ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे”
-
चन्द्रघंटा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.
-
कूष्माण्डा
कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.
-
स्कंदमाता
स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.
-
कात्यायनी
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.
-
कालरात्रि
काल म्हणजे वेळ,समय.काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.
-
महागौरी
गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे.शुद्धता निरागसतेमधून येते.महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ.
सिद्धिदात्री
जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री.जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा,गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे ‘सिद्धी’.साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात.जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील.
छायाचित्रे
विश्वस्त मंडळ





